‘महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ची सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतील दहावी-बारावीची परीक्षा उद्यापासून (२६ सप्टेंबर) सुरू होत आहे.
राज्यभरातून १,३७,९०२ विद्यार्थी दहावीची आणि ९५,८३२ बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा ११ ऑक्टोबरला तर बारावीची परीक्षा २० ऑक्टोबरला संपेल. राज्यभरातील ७६६ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. गैरप्रकार रोखण्याकरिता व परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात याकरिता परीक्षा केंद्र परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण, निरीक्षकांच्या आकस्मिक भेटी आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांना विभागीय मंडळाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपल्या शंकांचे समाधान करता येईल.
हेल्पलाइन क्रमांक
*पुणे – ०२० २५५३६७१२,
*नागपूर – ०७१२-२५६०२०९
*औरंगाबाद – ०२४०-२३३४२२८
*मुंबई – ०२२-२७८९३७५६
*नाशिक – ०२५३-२५९२१४३
*कोल्हापूर – ०२३१-२६९६१०३
*अमरावती –  ०७२१-२६६२६०८
*लातूर – ०२३८२-२२८५७०
*कोकण – ०२३५२-२३१२५०
*राज्य मंडळ –  ०२० २५७०५२७१