शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाविषयी जाणीव विकसित व्हाव्या या करिता भरविला जाणारा पश्चिम भारतीय विज्ञान मेळावा वरळीच्या नेहरू विज्ञान केंद्रात सुरू झाला आहे. विज्ञानविषयक विचारांना चालना देणे, समस्यांचे निराकरण आणि संशोधनाची आवड बालवयात निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा मेळावा भरविण्यात येतो. यात विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर तयार केलेले आपले प्रकल्प मांडतात. प्रादेशिक स्तरावर निवड झालेल्या काही निवडक प्रकल्पांना देशस्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते. विज्ञान केंद्रात भरविण्यात आलेल्या २७व्या पश्चिम विभागीय मेळाव्यात महाराष्ट्रासह छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, गोवा, मध्य प्रदेश, दिव-दमण आणि राजस्थान येथील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हा मेळावा २० डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. शाळांमधील विद्यार्थी या मेळाव्याला भेट देऊन या प्रकल्पांची माहिती घेऊ शकतात.