मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे कालिना संकुलात सुरू असलेल्या पक्षी, मासे आणि प्राण्यांच्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभतो आहे. आतापर्यंत हजारो प्राणी आणि पक्षीप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. या प्रतिसादामुळे आणखी एक दिवस म्हणजे सोमवापर्यंत (७ जानेवारीपर्यंत) हे प्रदर्शन लांबविण्याचा विचार सुरू आहे.
सायबेरियन जातीचा पेंढा भरलेला वाघ या प्रदर्शनाचे आकर्षण ठरतो आहे. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे पेंढा भरलेले प्राणी प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन मोफत असून सकाळी १० ते सायंकाळी ७.३० दरम्यान विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलात खुले राहील. संजीवन ट्रस्टचे साहाय्य या प्रदर्शनाला लाभले आहे.
ताज्या पाण्यातील मासे, समुद्रातले मासे, पाळीव व रंगीत पक्षी, साप, कुत्रे, मांजरी यांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. माशांचे ४० ते ४५ टँक्स, पाळीव प्राण्यांचे ४०-४५ पिंजरे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. मासे कसे पाळावे, काय काळजी घ्यावे, पाळीव प्राण्यांची कशी काळजी घ्यावी या बाबत तज्ज्ञांकडून व्याख्याने दिली जाणार आहे.