‘सीबीएसई’ची दहावी-बारावीची परीक्षा १ मार्चपासून

‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ची (सीबीएसई) दहावी-बारावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार असून १७ एप्रिलपर्यंत

प्रतिनिधी, मुंबई | January 3, 2013 3:13 AM

‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ची (सीबीएसई) दहावी-बारावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार असून १७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. १ मार्चला चित्रकला या विषयाने दहावीच्या परीक्षेला सुरुवात होईल. त्यानंतर २ मार्चला गणित, ४ मार्चला हिंदी या प्रमाणे परीक्षा होतील. ११ मार्चला भाषा, १२ मार्चला सामाजिक शास्त्र आणि १४ मार्चला विज्ञान विषयाची परीक्षा होईल. १५ मार्चला ‘होम सायन्स’ या विषयाने दहावीची मंडळ स्तरावरील परीक्षा संपेल. त्यानंतर शालेय स्तरावरील परीक्षा घ्यावी, असे मंडळाने सुचविले आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत १ मार्चला इंग्रजी त्यानंतर ४ मार्चला इतिहास, ५ मार्चला भौतिकशास्त्र, ६ मार्चला बिझनेस स्टडीज, ८ मार्चला राज्यशास्त्र, ११ मार्चला रसायनशास्त्र, १३ मार्चला भूगोल याप्रमाणे पेपर होणार आहेत. १५ मार्चला जीवशास्त्र, १६ मार्चला होम सायन्स, २० मार्चल गणित या प्रमाणे परीक्षा होतील. सीबीएसईच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक पाहता येईल.

First Published on January 3, 2013 3:13 am

Web Title: cbsc board ssc and hsc exams from 1st march
टॅग: Cbsc,Education,Exams,Hsc,Ssc