25 May 2016

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मालदार

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नूरमहम्मद नबीसाहेब मालदार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल के.

प्रतिनिधी मुंबई | December 14, 2012 4:39 AM

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नूरमहम्मद नबीसाहेब मालदार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर, २०१२ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर हे पद रिक्तच होते. कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुढील पाच वर्षे डॉ. मालदार या पदावर राहतील.
डॉ. मालदार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयातून सुवर्णपदकासह पदवी मिळविली. पदव्युत्तर शिक्षणातही ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ या विषयातून त्यांनी विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला. १९८१ साली पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली.

First Published on December 14, 2012 4:39 am

Web Title: dr maldar is the new chancellor of solapur university