तपासासाठी तंत्रशिक्षण विभागाची विशेष समिती

वैद्यकीय अभ्यासक्रमानंतर आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे दिलेल्यांचीही झाडाझडती तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमालाही बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश झाल्याचे समोर आल्यानंतर तंत्रशिक्षण विभागाने प्रवेशांची तपासणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आणि इतर अनुषंगिक लाभ मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते. ‘लोकसत्ता’ने ही बाब उजेडात आणली होती.

त्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय संचालनालयाने प्रवेशांची छाननी सुरू केली होती. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागात बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश झाल्याचेही समोर आले होते. त्यामुळे आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला झालेल्या प्रवेशांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

यासाठी तंत्रशिक्षण विभागाने विशेष समिती स्थापन केली. सर्व महाविद्यालयांतील १९९० पासूनच्या विद्यार्थ्यांची माहिती या समितीने मागितली आहे.

यामुळे महाविद्यालयांना १९९० पासूनच्या विद्यार्थ्यांचे सर्व तपशील द्यावे लागणार असून, समितीच्या चौकशीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नामसाधम्र्याचा गैरफायदा

ल्ल नामसाधम्र्याचा गैरफायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे या समितीच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

ल्ल या समितीने मन्न्ोवारलू, कोळी महादेव, राजगोंडा, ठाकूर, ठाकर या जमातीची प्रमाणपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे मागितली आहे.