नेट-सेटच्या प्रश्नी कोणतेही प्रकरण न्यायालयात प्रलंबित नाही, असा दावा नेट-सेटबाधित ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो) या संघटनेने केला आहे.
आंदोलनाबाबत एमफुक्टोचे अध्यक्ष ए. टी. सानप यांनी सांगितले, ‘सर्वोच्च न्यायालयात नेट-सेट बाधित शिक्षकांबाबत याचिका दाखल आहे. न्यायालयाने अंतरिम आदेश दिले आहेत. त्याची आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयात एखादे प्रकरण प्रलंबित असेल, तरी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी थांबवण्यात येणार नाही, असे म्हणण्यात आले आहे. त्यानुसार न्यायालयाच्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी.’