पुणे विद्यापीठ हे वैमानिक प्रशिक्षण सुरू करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार असून जर्मनी येथील एफएफएल इन्स्टिटय़ूटच्या सहकार्याने पुणे विद्यापीठ हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
‘एफएफएल इन्स्टिटय़ूट’ ही वैमानिक प्रशिक्षण देणारी जर्मनीतील सर्वात जुनी संस्था आहे. ही संस्था पुणे विद्यापीठाशी करारबद्ध होत असून पुणे विद्यापीठामध्ये वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न सध्या पुणे विद्यापीठात केला जात आहे. सध्या भारतामध्ये सुरू असणाऱ्या डिरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम असणार आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामध्ये हा अभ्यासक्रम चालवण्यात येणार आहे. एकूण अठरा महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम असून त्यासाठी साधारण ४५ लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अभ्यासक्रमातील थिअरीचा भाग पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामध्ये आणि प्रात्यक्षिक जर्मनीमध्ये एफएफएल इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवले जाणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमासाठी एकावेळी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठीचे निकष अजून निश्चित झाले नसून त्यासंबंधी सध्या चर्चा सुरू आहे, असे पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी सांगितले.

असा झाला शिक्षक शाळाबा..
* डिसेंबरमध्ये बालस्नेही (आनंददायी) शिक्षणासाठी दोन दिवसांची कार्यशाळा
* याच महिन्यात मुख्याध्यापकांसाठी पाच दिवसांचे सक्षमीकरण शिबीर
* २८ जानेवारीला सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाअंतर्गत ‘प्रकल्प’ कसे करावेत यासाठी कार्यशाळा
* जानेवारीमध्ये प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी आठवडाभर शिक्षक सिंधुदुर्गच्या सफरीवर
* फेब्रुवारीत पाचवी ते आठवी वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण
* ब्रिटिश कौन्सिलतर्फे १९ ते २५ फेब्रुवारी रोजी इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण
* फेब्रुवारीत ५ दिवस सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाअंतर्गत प्रशिक्षण
* दुष्काळी गावांतील शिक्षक गावातील पाणीपुरवठय़ाची तपासणी करण्यासाठी २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान शाळेबाहेर
* व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत ‘सलाम मुंबई’कडून रत्नागिरीत २७ आणि २८ फेब्रुवारीला दोन दिवसांचे प्रशिक्षण
* याशिवाय मीना मंच, शैक्षणिक साहित्य निर्मिती, मराठी-हिंदी विषयांच्या शिक्षकांकरिता समुपदेशनाचे प्रशिक्षण, किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या समस्यांवर यशदातर्फे प्रशिक्षण, राज्य विज्ञान केंद्रातर्फे गणित शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम