अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ आपल्याच प्रांतात सापडतं. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न.

काही पदार्थ आपल्या लोकजीवनात असे बेमालूम मिसळून जातात की, ते कधीकाळी परक्या मुलखातून आले आहेत याचाही विसर पडतो. एखाद्या मोठ्ठय़ा घरात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या कुटुंबात एखादा दूरचा नातलग कामानिमित्त काही वर्षे मुक्कामाला येतो. त्या घरात मिसळून जातो आणि आजूबाजूचे लोक बाहेरून आलेल्या त्या माणसाचे खरे आडनाव विसरून त्या कुटुंबाच्या आडनावानेच ओळखू लागतात. ‘समोसा’ या पदार्थाचं अगदी अस्संच झालंय. भारतीय नाश्त्यातील चवदार पदार्थ म्हणून जगभरात त्याची छाप पडली आहे; पण मूळचा हा बाहेरगावचा पाहुणा बघताबघता घरातलाच झाला आहे.
प्राचीन व्यापारी मार्गाने समोसा भारतात आला. मध्य आशिया हे त्याचं जन्मस्थान. समोसा का निर्माण झाला यामागे खूपच साधं गणित आहे. प्रवासासाठी निघालेले अरब व्यापारी रात्रीच्या वेळी मुक्कामास थांबायचे. दिवसभराच्या शिणवटय़ामुळे खूप तयारी वगैरे करून काही पक्वान्नं बनवण्याचा उत्साह नसायचा. त्यामुळे पोटभरीचं पण गरमागरम काही खाता यावं या हेतूने इतर पदार्थासोबतच समोसा जन्माला आला. कच्चे समोसे आत सारण भरून पिशवीतून नेता यायचे. रात्री जेवणाच्या वेळी फक्त तळले की काम फत्ते! या गरजेपोटी समोशांची निर्मिती झाली.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

समोसा या नावाविषयी लहानपणापासून आपल्याला एक आकर्षण वाटतं. याला समोसाच का नाव दिलं असावं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या नावाचं मूळ पर्शियन आहे. पर्शियन भाषेत सारण भरलेल्या पदार्थासाठी ‘संबोसाग’ हा शब्द होता. तिथून अरबांकडे त्याचं संबुसक अथवा संबुसाज असे नामकरण झाले. अरबांच्या पाककृतीच्या पुस्तकात त्याचा हा उल्लेख आहे. आजही इजिप्त, सीरिया, लेबनन या देशांमध्ये ‘संबुसक’ या नावानेच समोसा खाल्ला जातो. आनंदाची गोष्ट ही की, काही पदार्थ जगभरात इतक्या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात, की परक्या देशात त्या पदार्थाला काय संबोधावे हा संभ्रम निर्माण होतो. या वर नमूद देशांत समोसा म्हणा संबोसाग म्हणा, संबुसक म्हणा, उच्चार साधारण सारखा असल्याने विशेष अडचण होणार नाही.

इब्नबटुटा या प्रसिद्ध प्रवाशाने त्याच्या नोंदवहीत १३३४ साली केलेले वर्णन पहा. संबुसक म्हणजे गव्हाच्या पिठाच्या आवरणात मांस, बदाम, पिस्ते, कांदा यांनी तयार सारण भरून शुद्ध तुपात तळलेला अतिशय चविष्ट पदार्थ.
भारताबाहेर बऱ्याचशा देशांत समोसासदृश पदार्थ खाल्ले जातात. मात्र त्या पदार्थाच्या आतलं सारण बऱ्याचदा मांसमिश्रित असतं. आपल्याकडील समोसेही सुरुवातीला मांसाहारींसाठी पर्वणी होती; पण शाकाहारींची सोय बघून मांसाच्या ठिकाणी बटाटा आला आणि समोसे शाकाहारी झाले. एखाद्या पदार्थाचं रूप देशाच्या संस्कृतीगणिक कसं बदलत जातं हे पाहणं खरंच खूप वैशिष्टय़पूर्ण आहे. बटाटा आणि समोसा अगदी नंतर जुळलेलं समीकरण. तरी ‘जब तक रहेगा समोसेमें आलू तेरा रहुंगा ओ मेरी शालू’ असं गाणं सिनेमासाठी लिहिण्याचा मोह गीतकाराला आवरलेला नाही.

भारताच्या सगळ्या प्रांतांत समोसा खाल्ला जातो. इथेही प्रत्येक प्रांताने आपल्या इच्छेने त्याचं नामकरण केलंच आहे. गोड समोसा मावा, गुजिया या नावाने ओळखला जातो. हैदराबादेत हाच समोसा ‘लुख्मी’ होतो. बंगालमध्ये त्याला ‘सिंगारा’ म्हणून साद घातली जाते. गोव्यात पोर्तुगीजांच्या ओठातून घेतलेला ‘चामुका’ या समोशांना पर्यायी ठरतो. नावं वेगवेगळी पण एकुणात पदार्थ तोच. समोशाची ती त्रिकोणाकृती, त्याचा तो तळल्यानंतर येणारा सोनेरीसर रंग चटणीसोबत रंगत वाढवतो. भारतभरात अशी अनेक माणसं दाखवता येतील, ज्यांच्या रोजच्या नाश्त्याचा समोसा हा अविभाज्य भाग आहे. विशेषकरून दिवसभर फिरतीच्या कामावर असणारी मंडळी, रिक्षा-टॅक्सीचालक एखाद्या ठरलेल्या फरसाणवाल्याकडे उभ्या उभ्या चटणीसोबत एखादा समोसा खाताना दिसले की, समोशाच्या आमपणाची खात्री पटते; पण त्याच वेळी अनेक महत्त्वाच्या कॉर्पोरेट मीटिंग्ज, किटीपार्टी यांचीही हा समोसा शान वाढवतो.

म्हणूनच हा समोसा उत्तम समन्वयक आहे. हातावर पोट असणाऱ्या गरिबांपासून ते चकचकीत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पांढरपेशांपर्यंत आणि यारदोस्तांसोबत खाने का सिर्फ बहाना चाहिये या हेतूने गप्पा मारत हादडलेल्या कॉलेजकट्टय़ावरील समोसा-पावपासून ते भिशी वा किटीपार्टीतल्या गॉसिपची रंगत वाढवणाऱ्या रिफाइंड ऑइलमधल्या समोशापर्यंत सर्वाना तो एकाच न्यायाने वागवतो. सगळे भेद नाहीसे करतो आणि यातच त्याच्या लोकप्रियतेचं गुपित दडलं आहे.