अडचणीतील यंत्रमागधारकांना सुताचा पुरवठा होणार

अडचणीतील यंत्रमागधारकांना सुताचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला १ कोटी रुपये भागभांडवलाची मदत केली आहे. महामंडळाने या रकमेचा रास्त वापर करून ती शासनाकडे परतफेड केल्यानंतर महामंडळाला उर्वरित सहा कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात येईल, असे राज्याचे सहकार, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगितले.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या इचलकरंजी येथील मुख्यालयामध्ये वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांच्या हस्ते यंत्रमागधारकांना साईज्ड बिमे व सुताचा पुरवठा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने गेली काही वष्रे व्यवहार ठप्प असलेल्या यंत्रमाग महामंडळामध्ये आता हालचाल जाणवू लागली आहे. यानिमित्ताने मथुरा हायस्कूलच्या पटांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालक व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील होते.

प्रास्ताविकामध्ये महामंडळाचे अध्यक्ष िहदुराव शेळके यांनी, ४५ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या महामंडळाला शासनाने २० कोटीचे अनुदान मंजूर केले असून अद्याप ६ कोटी २३ लाख रुपये भागभांडवल शिल्लक राहिले असून ते शासनाने द्यावे. तसेच ई निविदा ऐवजी यंत्रमाग महामंडळाचे कापड शासकीय उपक्रम, महामंडळांनी दर कराराप्रमाणे खरेदी करावी अशी मागणी केली. सध्या ५० गरजू यंत्रमागधारकांना सुताचा पुरवठा केला असून ती संख्या अडीच हजारापर्यंत नेण्याचा मनोदय व्यक्त केला.

शेळके यांच्या मुद्याचा उल्लेख करून वस्त्रोद्योग मंत्री देशमुख म्हणाले, ई निविदा सुरु करण्यामुळे शासनाला ३० टक्के लाभ होत असल्याचे दिसून आले असल्याने ही पद्धत बंद करता येणार नाही. या ऐवजी खासगी ठेकेदार व महामंडळाचा दर यामध्ये ५ टक्क्यांचा फरक असेल, तर कापड पुरवठा यंत्रमाग महामंडळाला देण्यास प्राधान्य राहिल.

पालकमंत्री पाटील म्हणाले,की राज्य शासन सहकारी सुतगिरण्यांना प्रति चाती ३ हजार रुपये अनुदान देणार असून याबदल्यात सुतगिरण्यांनी यंत्रमागधारकांना माफक दरात सुत पुरवठा करण्याची अट घातली जाणार आहे.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले,की यंत्रमाग महामंडळ सक्षमपणे चालवून यंत्रमाग उद्योगामध्ये वेगळा पर्याय निर्माण केल्याशिवाय स्थिरता येणार नाही. यंत्रमाग महामंडळ विणकरांना ६ पसे प्रतिपीक प्रमाणे मजुरी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.