करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा नवरात्रोत्सव दरम्यान प्लास्टिक बंदीसह, महिलांसाठी नवीन हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नवीन तेरा पाìकगची ठिकाणे निश्चित केली असून मंदिर परिसरातील स्थानिक नागरिकांच्या दुचाकी व मोटारी पाìकगसाठी अन्यत्र व्यवस्था केली आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी महालक्ष्मी मंदिर परिसराची पाहणी केली. यानंतर संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांच्यासह संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बठक घेतली. बठकीत डॉ. सनी यांनी नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांची संख्या २५ ते ३० लाख असल्याचे सांगून सर्व यंत्रणांनी या काळात समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

उत्सव काळात भाविकांच्या सोईसाठी विविध १३ ते १४ ठिकाणी पाìकगची सुविधा करण्यात आली आहे. उत्सवकाळात मेन राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, एमएलजी हायस्कूल, शिवाजी स्टेडियम, गांधी मदान, पेटाळा मदान, दसरा चौक, खानविलकर पेट्रोलपंप शेजारी, पंचगंगा घाट, डॉ. झाकिर हुसेन उर्दू शाळा, सुसर बाग, लक्ष्मीपुरी या ठिकाणी पाìकगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सांगीतले.

हिरकणी कक्ष, प्लास्टिक बंदी, लॉकरची व्यवस्था

उत्सव काळात मंदिरात महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. यामुळे महिलांसाठी मंदिर परिसरात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. हा कक्ष २४ तास खुला राहणार आहे. स्तनपानासाठी, तसेच महिलांना विश्रांती व चेंजिंगसाठी हिरकणी रूम उपलब्ध करण्यात येणार आहे. उत्सवकाळात प्लास्टिक बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांसाठी शेतकरी संघाच्या कार्यालयात लॉकरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.