बाजार समितीत शेतीमालाची अडत आकारण्यावरून सहाव्या दिवशीही व्यवहार ठप्प झाल्याने मंगळवारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा  घेत शेतकऱ्यांचे हाल सुरु असताना कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत कोठे आहेत, असा सवाल केला. यामुळे शिवसेना विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना असा वाद रंगला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार , विजय देवणे, शहर प्रमुख दुग्रेश िलग्रस यांनी शासनाच्या शेतकरी हिताच्या योजनांची खिल्ली उडवली. यातून त्यांचा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष , बाजार समितीचे संचालक भगवान काटे यांच्याशी जोरदार वाद झाला.

अखेर , जिल्हा उपनिबंधक ए. पी. काकडे यांनी बाजार समितीने शेतकऱ्यांना पोलीस संरक्षण पुरवून भाजीपाला खरेदी – विक्री सुरु करावी , असा आदेश दिला. याबाबत कोणी अटकाव करत असेल तर पोलीस कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.  शेतकरी हितासाठी शासनाने काही चांगले निर्णय घेतले आहेत . शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत रद्द करून ती खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अडत कोणाकडून आकारायची या वादाने उचल खाल्ली असून शेतकरी, बाजार समिती व अडते या मुद्द्यावर ठाम आहेत.

व्यापारीही परवडत नसल्याचे सांगत अडत देणार नाही,  यावर ठाम असल्याने हा गुंता वाढीस लागला आहे. याबाबत अनेक बठका होऊनही मार्ग निघत नसल्याने या वादात आज शिवसेनेने उडी घेतली .

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेतली. शेतकरी, खरेदीदारांना पोलीस संरक्षण देऊन सौदे पूर्ववत करण्याची मागणी विजय देवणे यांनी केली. त्यावर जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी तसे पत्र समितीला दिले. इथपर्यंतचा प्रवास ठीक होता , पण बाजार समितीत वादाने उचल खाल्ली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  बाजार समितीचे  सभापती सर्जेराव पाटील व संचालक यांना त्यांच्या भूमिकेवर जाब विचारला . चच्रेच्या ओघात त्यांनी आठ दिवस बंद असताना समिती म्हणून काय भूमिका घेतली, सदाभाऊ खोत कुठे आहेत? असा सवाल केला. यावर काटे यांनी सदाभाऊंशी चर्चा झाली असून लवकरच  मार्ग निघेल, असे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला . शेतकरी आíथकदृष्टया मरत असताना आठ दिवस चर्चा कसली करता, अशी विचारणा संजय पवार व विजय देवणे यांनी केली.  जिथे आठवडी बाजार सुरु झाला ते तळिरामांचे अड्डे बनल्याची टीका संजय पवार यांनी केली.