पोलीस कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल कुमार भीमराव पोवार याला दोषी धरून येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी २ वष्रे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. निकाल ऐकल्यानंतर पोवार हा चक्कर येऊन न्यायालयातच कोसळला. लाचेची एक हजार रुपयाची रक्कम त्याने गिळली होती.

अशोक लक्ष्मण गायकवाड याच्या विरोधात त्याची पत्नी रुपाली हिने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या  तक्रारीनुसार गायकवाड याच्यावर कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली व त्याचा मोबाईल हॅण्डसेट काढून घेतला. या प्रकरणी गायकवाड याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे १४ नोव्हेंबर २००८ रोजी तक्रार दिली होती.

त्यानुसार लाचलुचपत खात्याने सापळा रचून पोवार याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यावेळी पोवार याने एक हजार रुपयांची लाच गिळून पुरावा नष्ट केला होता.