21 October 2017

News Flash

दर्शन शहा खूनप्रकरणी योगेश चांदणेला जन्मठेप

जुना राजवाडा पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास करून १३ जानेवारी २०१३ मध्ये आरोपी चारू चांदणे

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: October 11, 2017 3:27 AM

दर्शन शहा 

अवघ्या दहा वर्षांच्या दर्शन रोहित शहा याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २७ रा. शुश्रूषानगर, देवकर पाणंद) याला मंगळवारी दुहेरी जन्मठेप आणि १ लाख ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडातील एक लाख रुपये दर्शन शहा याची आई स्मिता शहा यांना देण्याचा आदेश न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिला.

उसनवारीवर घेतलेल्या पशाची परतफेड करण्यासाठी चारू चांदणे याच्याकडे पसे नव्हते, त्यामुळे चोरी किंवा खंडणीच्या मार्गाने पसे उपलब्ध करून ते परत करण्याची योजना त्याने तयार केली होती.

दर्शन शहा याच्या आईकडे सोने असल्याचे चारू चांदणे याने पाहिले होते, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबर २०१२ मध्येच त्याने दर्शनच्या घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

यानंतर दर्शनच्या अपहरणाचा कट करून त्याने २५ डिसेंबर २०१२ मध्ये रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान कॉलनीतून दर्शनचे अपहरण केले. ऊस खाण्याचे आमिष दाखवून त्याने दर्शनचा निर्घृण खून केल्यानंतर त्याने २५ तोळे सोने देण्याच्या धमकीची चिठ्ठी दर्शनच्या दारात टाकली. दुसऱ्या दिवशी दर्शनचा मृतदेह सापडल्यानतंरही आरोपी चारू घटनास्थळी उपस्थित होता. परिसराची माहिती देऊन पंचनाम्यातील पंच म्हणूनही त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

जुना राजवाडा पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास करून १३ जानेवारी २०१३ मध्ये आरोपी चारू चांदणे याला अटक केले.

न्यायालयात ३० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांनुसार न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आरोपी चांदणे याला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.

दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त अकरा महिने कारावास भोगावा लागणार आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यशवंत केडगे, सहायक पोलीस निरीक्षक  संतोष डोके, वैष्णवी पाटील आदींनी तपास केला होता.

कमी शिक्षेची आरोपीची विनंती

न्यायलयात कामकाज सुरू होताच न्यायाधीशांनी आरोपीला तीन गुन्ह्यंत तुला दोषी ठरवले आहे. याबाबत तुला कही सांगायचे आहे काय, अशी विचारणा केली असता, ‘मी गुन्हा केलेला नाही. तरीही शिक्षा द्यायची असल्यास मला कमीत कमी शिक्षा द्या. माझे आई-वडील वृद्ध आहेत. मी पाच वष्रे तुरुंगात शिक्षा भोगली आहे,’ अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली.

First Published on October 11, 2017 3:27 am

Web Title: darshan shah murder case kolhapur life imprisonment yogesh chandane