महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पध्रेच्या अंतिम फेरीदरम्यान नाट्यप्रयोग सादर करत असतानाच कोल्हापूरच्या सागर चौगुले या हौशी कलाकाराचा रंगमंचावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे विशेष पुरस्कार प्रदान करून सागर यांच्या पश्चात कुटुंबीयांना आíथक विवंचनेतून दिलासा देऊ, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी  सोमवारी दिली. सागर घटक असलेल्या हृदयस्पर्श व्यासपीठाच्या वतीने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट भेटली. यावर  क्षीरसागर यांनी तातडीने तावडे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देऊन पश्च्यात कुटुंबीयांच्या परिस्थितीची दाहकता मांडून शासनाच्यावतीने आíथक मदत देण्यासाठी विनंती केली.

यावर  तावडे यांनी त्यांच्या सचिवांना आíथक मदतीची कार्यवाही तत्परतेने करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री सहायत्ता निधीतूनही सागर चौगुले यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याकरिता मागणी पत्र क्षीरसागर प्रत्यक्ष भेटून सादर करणार आहेत.

पुणे येथील टिळक स्मारक मंदिरामध्ये राज्य नाट्य स्पध्रेच्या अंतिम फेरीदरम्यान कोल्हापूरचा संघ ४० कलाकारांसह छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘अग्निदिव्य’ हे नाटक सादर करत होता. या नाटकात सागर चौगुले छत्रपती शाहू महाराजांची प्रमुख भूमिका साकारत होता. नाटकाचे मध्यांतर होण्याआधीच संवाद म्हणताना सागर चौगुले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते रंगमंचावरच कोसळले. त्याना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सागर चौगुले हे कोल्हापूरचे सुपुत्र असून, त्यांचा जाहिरात क्षेत्राशी निगडित व्यवसाय आहे. चौगुले यांनी काही चित्रपटांसह मालिकांमध्येही अभिनय साकारला आहे. अशा हौशी कलाकाराच्या आकस्मित जाण्याने कोल्हापूर कला क्षेत्रावर आभाळ कोसळले आहे. घरचा एकमेव कर्ता व्यक्ती असलेल्या चौगुले यांच्या जाण्याने पश्च्यात आई, पत्नी, दीड वर्षांची लहान मुलगी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यामागे असलेल्या परिवारास सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही  क्षीरसागर यांनी सांगितले. शिवसेना शहर कार्यालय येथे सागर चौगुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.