म्हैसूरच्या जगमोहन पॅलेसमधील राजा रविवर्मा यांनी रेखाटलेल्या अनेक चित्रांमध्ये सावळाराम हळदणकर यांचे ‘ग्लो ऑफ होप’ चे जलरंगात चितारलेले चित्र हे रसिक पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. विलक्षण सौंदर्याची धनी असलेली, हातात समई घेतलेली ही ललना जितकी सुंदर आहे तितक्याच डौलदारपणे तिची प्रत्येक ढब या चित्रात उतरली आहे. या चित्रातली स्त्री तरुण दिसत असली, तरी नुकतेच तिने शंभरीत पदार्पण केले आहे. कलानगरी करवीरनगरीतील शंभर वर्षीय मॉडेल गीताताई उपळेकर यांची कहाणी ही आगळी.

lady_with_lamp

balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

सर्वाचा समज असा की ते चित्र राजा रविवर्मा यांचेच आहे. पण आहे गीताचे वडील सावळाराम हळदणकर यांच्या कुचल्यातून साकारलेले. यावर अलीकडेच प्रकाशझोत पडला आहे. गीताताईंचे वडील त्या काळातील प्रसिद्ध चित्रकार होते. दिवाळीला नटूनथटून हातामध्ये दिवा घेतलेली तेरा वर्षांची मुलगी गीता घरातील आतल्या खोलीतून बाहेर येताना त्यांनी पाहिली आणि दिवाळी झाल्यावर तुझं असेच चित्र रेखाटू, असा शब्द त्यांनी दिला.

दिवाळीनंतर लगेचच गीताला समोर ठेवून त्यांनी हे अजरामर चित्र रेखाटले. या चित्राची जागा आज जगप्रसिद्ध ऐतिहासिक म्हैसूर पॅलेसमध्ये आहे. म्हैसूरचे राजे वडियार यांना चित्रकलेची विशेष आवड होती.

untitled-5

त्यांनी हे चित्र त्याकाळी तीनशे रुपयांना विकत घेतले. तेव्हापासून ते त्यांच्या जगमोहन पॅलेसची शान वाढवत आहे. अंधाऱ्या आयुष्यात कितीही वादळे आली, तरी सारे काही ठीक होईल अशी आशा घट्ट धरून ठेवून तेजस्वी बाण्याने वाटचाल करतच राहायची.. असा काहीसा संदेश देणारी ही कलाकृती. या आशेच्या प्रकाश पर्वातील अर्थातच ‘ग्लो ऑफ होप’ च्या कोल्हापूरच्या गीता उपळेकर या तरुणीने वयाची शंभरी गाठली आहे.

गीताचे वडील मूळचे कोकणातील सावंतवाडीचे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सावंतवाडी संस्थानच्या राजेसाहेबांचे लक्ष हळदणकरांच्या गुणवत्तेकडे वेधले. राजेसाहेबांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे अंगभूत कलेला जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाची साथ मिळाली. हळदणकर यांच्या चित्रांची प्रदर्शने मुंबई, मद्रास, शिमला तसेच लंडनमधील आर्ट सोसायटी ऑफ ब्रिटिश आर्टीस्टच्या कलादालनात झाली आहेत. ३ वेळा ते बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरांच्या पदकाचे मानकरी ठरले. त्यांच्या कुंचल्यातून अवघ्या साडेतीन तासात जगातली सर्वोत्तम अशी  ही तिसरी कलाकृती निर्माण झाली. या कलाकृतीतील गीता कोल्हापुरातल्या उपळेकरांच्या घरात आली. जगातील पहिल्या तीन कलाकृतीत स्थान असणाऱ्या चित्रातील मॉडेल कोल्हापूरची असल्याने कलानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.