‘राधानगरी’चे दरवाजे दुसऱ्यांदा उघडले

जिल्हय़ाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोमदार पावसामुळे राधानगरी धरण या पावसाळय़ात दुसऱ्यादा भरले असून, शनिवारी सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणातून अकरा हजार नवशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  जिल्हय़ात गेल्या २४ तासांत  काल दिवसभरात सरासरी ११.४४  मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली असून, जिल्हय़ातील ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गतवर्षी एकदिवसाआड पाणीपुरवठा कराव्या लागणाऱ्या कोल्हापूरकरांचे यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे, तर बळीराजाची चिंताही मिटली असून, भात, भुईमूग, ऊस या पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे.

Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
Demand march regarding road in Kolhapur
चांगले रस्ते वा हाडांचे दवाखाने द्या; कोल्हापुरात अनोख्या मागणीचा मोर्चा
water shortage Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता; नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट
Jagar of Chhatrapati shivaji maharaj in Satara district
सातारा जिल्ह्यात शिवछत्रपतींचा जागर

शहरात पावसाचा जोर मंदावला आहे. आज दिवसभर काळय़ाभोर ढगांची गर्दी झाली तरी पावसाच्या तुरळक सरी अधूनमधून पडत होत्या. धरण क्षेत्रात संततधार पाऊस कायम आहे.  विशेषत: राधनागरी, गगनबावडा, आजरा या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे आज दुपारी राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. यातून ११ हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  परिणामी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. दूधगंगा  धरणही पूर्णक्षमतेने भरले असून, या धरणातूनही आज मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्हय़ातील इतर लघु आणि मध्यम प्रकल्पही पूर्णक्षमतेने भरले आहेत.

जिल्हय़ात गेल्या २४ तासांत काल दिवसभरात सरासरी  ११.४४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्हय़ात १ जूनपासून आतापर्यंत एकूण १७२७६ मि.मि. पाऊस झाला आहे. ३.७१, शाहुवाडी ८.०० हातकणंगले ०.६३, शिरोळ १.५७, राधानगरी २५.००, गगनबावडा ५३.५०, भुदरगड १५.००, गडिहग्लज ३.१०, आजरा १०.५० व चंदगड ११.३३ अशी एकूण १३७.२३ मि.मि. पावसाची नोंद झाली.