24 August 2017

News Flash

कोल्हापूर महापालिकेत रणकंदन: महापौर पुत्राने ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांना बदडले

राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीस असलेल्या आदिल फरासने बेदम मारहाण केली.

कोल्हापूर | Updated: June 19, 2017 6:02 PM

कोल्हापूर महापालिकेचे संग्रहित छायाचित्र

दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी रस्ते हस्तांतराचा ठराव कोल्हापूर महापालिकेत करू नये अशी मागणी करण्यासाठी गेलेले आपचे जिल्हाध्यक्ष भगवान पवार, संदीप देसाई, उत्तम पाटील यांना महापौरांचे सुपूत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आदिल फरास व त्याच्या समर्थकांनी महापौर दालनात बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील निवेदनाच्या प्रती फाडून टाकण्याबरोबर छायाचित्रणाचा कॅमेऱ्याचीही मोडतोड करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने हमरस्त्यावरील दारू विक्रीची दुकाने, बिअरबार ५०० मीटर अंतरावर न्यावेत असा आदेश दिला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे रस्ते आपल्या अधिकारांतर्गत घेण्याची तयारी सुरू केली आहे. याला विरोध करण्यासाठी दि. २१ एप्रिल रोजी आपचे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महापौर हसिना फरास यांना भेटले होते. त्यांनी महापालिकेकडे रस्ते हस्तांतरण प्रक्रिया होणार नाही, तसा ठरावही केला जाणार नाही, असे आ”वासन दिले होते. मात्र उद्या (मंगळवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रस्ते हस्तांतर प्रक्रियेचा ठराव मंजूर करणार असल्याची माहिती आप कार्यकर्त्यांना मिळाली होती. याबाबतची वस्तूस्थिती समजून घेण्यासाठी भगवान पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ महापालिकेत गेले होते. तेव्हा तिथे भाजप-ताराराणी आघाडी या विरोधी पक्षांची बैठक सुरू होती. त्यांना याबाबत विचारणा केली असता. रस्ता हस्तांतरण विषयास आम्ही विरोधक म्हणून ठामपणे विरोध करणार असल्याचे सांगितले. तसेच यासाठी महापौरांना भेटण्याची सूचना केली.

त्यानुसार आपचे शिष्टमंडळ महापौरांच्या दालनात गेले. तिथे महापौर नसल्याने त्यांना संपर्क केला असता, त्यांनी आपण वैद्यकीय कारणासाठी बाहेर असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्या दालनात महापौरांचे पूत्र, माजी नगरसेवक आदिल फरास आले. फरास यांना महापालिकेच्या कामकाजात कसलाही हस्तक्षेप, लुडबूड करण्याची परवानगी नसतानाही ते आपणच महापौर असल्याच्या अविर्भावात पालिकेत वावरत असतात. आदिल फरास यांच्याकडे आपच्या शिष्टमंडळाने रस्ता हस्तांतराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर त्यांनी अरेरावीची भाषा सुरू केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आपच्या पदाधिकाऱ्यांनी आदिल फरास यांना आम्हाला अरेरावी करण्याचा तुम्हाला अधिकार कसा पोहोचतो, असा सवाल केला. त्यावर आदिल यांनी आपण महापौरांचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला. त्यावेळी भगवान पवार यांनी त्यांना प्रतिनिधी असल्याचे ओळखपत्र दाखवा अशी विचारणा केली. त्यावर आदिल फरास चांगलेच भडकले. त्यांनी काही समर्थकांना महापौर दालनात बोलावले. दालनाचा दरवाजा बंद करून आप पदाधकाऱ्यांना बेदम मारहाण केली. तर आपचे माध्यम प्रतिनिधी उत्तम पाटील यांच्याकडील कॅमेरा हिसकाऊन घेऊन मोडतोड केली. पाटील यांनाही चोप दिला.

पवार यांच्यासह शिष्टमंडळातील प्रतिनिधींना आदिल फरास यांनी अवमानकारक वागणूक दिली. महापौरांच्या दालनात झालेल्या ‘आदिल’शाही कारभाराचा निषेध नोंदवत असल्याचे सांगून पवार यांनी रस्ते हस्तातंर प्रक्रिया महापौरांसह इतरांनी चालवलेल्या कुकर्माचा पर्दाफाश करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

First Published on June 19, 2017 6:02 pm

Web Title: kolhapur municipality mayor son ncps secretary adil faras beaten aam aadmi partys worker
 1. भारत कदम
  Jun 19, 2017 at 10:26 pm
  जाहीर निषेध !
  Reply
 2. G
  ganesh avhad
  Jun 19, 2017 at 10:24 pm
  ही आदिलशाही नाही चालणार आप कार्यकरते अजून जिधीने लढतील
  Reply
 3. A
  Anand Shewale
  Jun 19, 2017 at 7:19 pm
  पाटील यांनाही चोप दिला." हे आहेत अजाणत्या राजाचे शिलेदार. तटकरे, मूत्रे पवार, ह्यांचे भुजबळ आणि स्वतः किती कुठे आहेत ?? खोलात.
  Reply
 4. A
  Anand Shewale
  Jun 19, 2017 at 7:17 pm
  अब्दुल सत्तार, नवाब िक, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे कमी होते म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आदिल फरास आता पवारांचे काम पुढे नेतोय. कसे झालेय ते बघा, "फरास यांना महापालिकेच्या कामकाजात कसलाही हस्तक्षेप, लुडबूड करण्याची परवानगी नसतानाही ते आपणच महापौर असल्याच्या अविर्भावात पालिकेत वावरत असतात. आदिल फरास यांच्याकडे आपच्या शिष्टमंडळाने रस्ता हस्तांतराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर त्यांनी अरेरावीची भाषा सुरू केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आपच्या पदाधिकाऱ्यांनी आदिल फरास यांना आम्हाला अरेरावी करण्याचा तुम्हाला अधिकार कसा पोहोचतो, असा सवाल केला. त्यावर आदिल यांनी आपण महापौरांचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला. त्यावेळी भगवान पवार यांनी त्यांना प्रतिनिधी असल्याचे ओळखपत्र दाखवा अशी विचारणा केली. त्यावर आदिल फरास चांगलेच भडकले. त्यांनी काही समर्थकांना महापौर दालनात बोलावले. दालनाचा दरवाजा बंद करून आप पदाधकाऱ्यांना बेदम मारहाण केली. तर आपचे माध्यम प्रतिनिधी उत्तम पाटील यांच्याकडील कॅमेरा हिसकाऊन घेऊन मोडतोड केली. पाटील यांनाही चोप दिला." हे आहेत अजाणत्या राजाचे शिलेदार.
  Reply
 5. A
  Anand Shewale
  Jun 19, 2017 at 7:10 pm
  वा राष्ट्रवादीचे गुंड छान कामे करताहेत.
  Reply
 6. Load More Comments