‘सनिक हो तुमच्यासाठी..’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्, शिवाजी महाराज की जय..’ असा जयघोष शनिवारी करवीरनगरीत ऐकू आला. भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी शेकडो कोल्हापूरकर हातात तिरंगा घेऊन भर पावसात रस्त्यावर उतरले होते.
यूथ ऑर्गनायझेशनने दोन तास भारतीय सनिकांच्या समर्थनासाठी वंदे मातरम रॅली या सर्वपक्षीय उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रायव्हेट हायस्कूल येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह, विविध संघटनेचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. काश्मीरमधील हिंसाचार अद्यापही शमण्याचे नाव घेत नाही. अशावेळी देशातील सर्वच जनतेने भारतीय सन्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यांच्यासमवेत काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सन्याला सर्वाधिकार द्यावेत आणि आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीही मागणी रॅलीच्या निमित्ताने करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, दुग्रेश लिंग्रस, महेश उरसाल, बंडा साळोखे, मधुकर नाझरे, अवधूत पाटील, विजय करजगार, सुनील पाटील, विराज ओतारी यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बीनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, मटण मार्केट येथून बिंदू चौक येथे रॅलीचे विसर्जन झाले.