जयजयकारांच्या घोषात महिपाळगड भारावला

अमर रहे.. अमर रहे, शहीद जवान महादेव तुपारे अमर रहे.  भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदेमातरम अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत वीरजवान महोदव तुपारे यांना चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील शिवराज हायस्कूलच्या पटांगणावर लष्करी व शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. लेह लडाखमधील दराज सेक्टरमध्ये ते सेवा बजावत असतांना प्रचंड बर्फवृष्टीत सापडून त्यांना वीरमरण आले.

या वेळी शहीद महादेव तुपारे यांच्या पाíथवास राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. याबरोबरच खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनीही पाíथवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. शहीद तुपारे यांचे तिरंग्यात लपेटलेले पाíथव मूळ गावी महिपाळगड  येथे आणण्यात आले. प्रथम त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांच्या अंत्यदर्शनासाठी पाíथव ठेवण्यात आले.  यानंतर  गावातून पाíथवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पाíथवावर पुष्पवृष्टी केली. रस्त्याचा मध्य मार्ग विविध फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. गावातील प्रत्येक चौकात महादेव तुपारे अमर रहे. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. पाíथव शिवराज विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित जनसमुदायाच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. राष्ट्रध्वज शहीद जवान महादेव तुपारे यांचे वडील पांडुरंग तुपारे यांच्या हाती लष्कराच्यावतीने अर्पण करण्यात आला. वडील पांडुरंग तुपारे यांनी शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पाíथवास पुष्पचक्र अर्पण करुन अखेरचा निरोप दिला.  लष्कराच्या ८  जवानांच्या तसेच पोलीस दलाच्या ८ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर शहीद तुपारे यांचे बंधू कुंडलिक तुपारे यांनी पाíथवास भडाग्नी दिला.

शासनाच्या वतीने ८ लाखाची मदत

शहीद  तुपारे हे कोल्हापूरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहेत. राज्य शासनाच्यावतीने शहीद तुपारे यांच्या कुटुंबीयांना ८  लाखाची मदत प्राधान्याने दिली जाईल, याबरोबरच केंद्र शासनाकडूनही मदत मिळेल , असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी सांगितले.