टी शर्ट विक्रेता पोलिसांच्या ताब्यात

बेळगाव आणि महाराष्ट्राचे नाते यांचा मुद्दा शुक्रवारी मराठीद्वेष्टय़ा कानडी प्रशासनाला चांगलाच बोचला. बेळगावात निघणाऱ्या क्रांती मोर्चासाठी लागणारे टी शर्ट आणि टोप्या यांची विक्री करणाऱ्या महाराष्ट्रातील युवकांना बेळगाव पोलिसांनी लक्ष्य बनवले. ‘मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे’ असे लिहिलेले टी शर्ट विकणाऱ्या एका तरुणाला बेळगावच्या खडे बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी जोरदार प्रयत्न चालवले होते. शहाजी भोसले (वय २५, रा. कोल्हापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

Vasant More has many cars gold and silver
वसंत मोरे यांच्याकडे आहेत अनेक गाड्या, सोने आणि चांदी
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Awaiting declaration for Lok Sabha election of three candidates from Ratnagiri Satara Thane Mumbai
महायुतीमधील पेच कायमच; रत्नागिरी, सातारा, ठाणे, मुंबईतील तीन उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा
Nana Patole
अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा प्लॅन; नाना पटोलेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ


बेळगाव येथे सकल मराठा समाजाचा १६ फेब्रुवारी रोजी मोर्चा निघणार आहे. त्यासाठी कोल्हापूर-सांगली भागातील ५-६ विक्रेते बेळगावात टी शर्ट, टोपी यांची विक्री करत आहेत. यातील भोसले हा बेळगावातील संभाजी चौकात ‘मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे’ असा मजकूर असलेले टी शर्ट विकत होता. त्याला कर्नाटक पोलिसांनी हरकत घेत त्याला ताब्यात घेऊन ३० हून अधिक टी शर्ट आणि इतर साहित्य जप्त केले. टी शर्टवर असलेला हा मजकूर वादग्रस्त असल्याचे कारण दाखवून ही पोलिसांनी सदर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. बेळगाव शहरात काही ठिकाणी फिरून असे साहित्य जप्त करण्याची मोहीमच पोलिसांनी उघडली होती.
याला महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे शहर अध्यक्ष दीपक दळवी व मराठी भाषिकांनी जोरदार विरोध दर्शवला. ते म्हणाले, महाराष्ट्रात असे मोच्रे निघाले तेव्हा अनेक मागण्या झाल्या, त्या सर्वच मागण्या शासनाने मान्य केल्या नाहीत. याचा अर्थ आंदोलकांना मागण्या करण्याचा मूलभूत हक्क आहे. यावरच गदा आणण्याचे काम कर्नाटक शासन करत आहे. गेली साठ वष्रे मराठी भाषक हे महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाने लढत आहे.
आताच मोर्चा हा त्याचाच एक भाग असताना कर्नाटक पोलिसांची दडपशाही अन्यायकारक आहे. आमचे वकील या युवकांच्या पाठीशी असून त्याची सोडवणूक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
मात्र त्या युवकावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर टी शर्ट विकणाऱ्या युवकावर झालेली कारवाई युवा वर्गात संताप उमटवून गेली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर कोल्हापूर जिल्ह्यात समाज माध्यमातून कर्नाटक शासनाचा तीव्र निषेध नोंदवला गेला.