शिवसेनेच्या कोल्हापूर मेळाव्यात टीका

लोकसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या पराभवास राष्ट्रवादी कॉँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप करीत येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात त्यांना उमेदवारी देऊन पाडण्याचा प्रकार कोल्हापूरच्या गादीचा अवमान आहे, असा आरोप करण्यात आला. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यातील वादास नवी फोडणी मिळाली  आहे.

शिवसेना सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी संभाजीराजेंची राज्यसभेवर झालेली नियुक्ती अभिमानास्पद व आनंददायी असल्याचे मत व्यक्त करतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. कोल्हापूर उत्तर, दक्षिण व करवीर मतदारसंघांत आपले आमदार पुन्हा झाले पाहिजेत, यासाठी शिवसनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन करून त्यांनी भविष्यात आपला शत्रू वेगळा असून, त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘एकला चलो रे’ याप्रमाणे वाटचाल ठेवायची असल्याचे सांगत भाजपशी टक्कर घेण्यास तयार राहण्याची सूचना केली.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसनिकांनी कामाला लागायचे असून, आता असणारी २५ सदस्य संख्या ४० वर न्यायाची आहे. आ. चंद्रदीप नरके, शिवाजी जाधव, दुग्रेश िलग्रस, हर्षल सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले.  किरण पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. कमलाकर जगदाळे यांनी आभार मानले.