राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पध्रेत मुलींच्या गटात कोल्हापूर आणि मुलांच्या गटात अमरावती विभागाने अजिंक्यपद पटकविले. अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत कोल्हापूरने अवघ्या चार गुणांनी विजय मिळविला, तर अमरावतीने मुंबईवर एकतर्फी विजय प्राप्त केला. स्पध्रेसाठी नविहद मल्टिपर्पज अ‍ॅकॅडमी व जयिहद मंडळाचे सहकार्य लभले.

इचलकरंजीतील जयिहद मंडळाच्या मदानावर तीन दिवस भरविण्यात आलेल्या या स्पध्रेला क्रीडाप्रेमींचाही उदंड प्रतिसाद लाभला. सलग तीन दिवस सायंकाळच्या सत्रात प्रकाशझोतात हे सामने सुरु होते. या स्पध्रेमध्ये कोल्हापूर, पूणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, लातूर, मुंबई अशा आठ विभागातील  मुले आणि मुलींचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये मुलींच्या गटात पुणे आणि कोल्हापूर, तर मुलांच्या गटात मुंबई आणि अमरावती यांनी अंतिम फेरी गाठली होती. मुलींची कोल्हापूर विरुध्द पुणे ही लढत अत्यंत रंगतदार झाली. प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळी केली. मात्र हा सामना कोल्हापूरने ७ गुणाने जिंकला. कोल्हापूरला ३१ तर पुणेला २४ गुण मिळाले. कोल्हापूरच्या आसावरी खोचरे व प्राजक्ता देसाई यांनी उत्कृष्ट खेळी करीत संघाला विजय प्राप्त करुन दिला. तर पुण्याच्या मानसी रोडे व पल्लवी जमदाडे यांनीही सुरेख खेळी केली. तर तृतीय क्रमांकासाठी झालेल्या नाशिक विरुध्द मुंबई या सामन्यात नाशिकने मुंबईचा २६ गुणांनी पराभव केला. मुलांच्या गटातील अमरावती विरुध्द मुंबई हा सामना एकतर्फीच झाला. सुरुवातीपासून अमरावतीने सामन्यावर ठेवलेली पकड शेवटपर्यंत कायम ठेवली. अमरावतीच्या जावेद पठाण व रघू घाटोळे यांच्या खेळीमुळे २८ गुणांनी विजय मिळाला. मुंबईच्या हंबीर व शीद यांनीही चांगली खेळी केली. तिसऱ्या क्रमांकासाठी पुणे विरुध्द नागपूर यांच्यातील सामना पुणे संघाने जिंकला. स्पध्रेत अनेक रंगतदार लढती पाहण्यास मिळाल्या.

विजेत्या संघांना कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले व राष्ट्रीय कबड्डीपटू मुक्ता चौगुले यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाटगे, राजेंद्र आतनुर, राम डाळ्या, उदय चव्हाण, स्पर्धा समन्वयक शंकर पोवार, शेखर शहा, उदय चव्हाण, प्रविण फाटक,  सौ. वैशाली नाईकवडे, संगिता नायडू, शुभांगी िशत्रे, सौ. पुष्पा मोरे, जोतिबा साळुंखे, राजू माने, दत्तात्रय कित्तुरे, संजय कुडचे, नितीन लायकर आदी उपस्थित होते.