25 September 2017

News Flash

भाजप प्रवेशाच्या ‘पतंग’बाजीला वेग

पश्चिम महाराष्ट्रातील एक बलाढय़ व्यक्तिमत्त्व भाजपात प्रवेश करणार

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: September 9, 2017 3:44 AM

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर चर्चा

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एक बलाढय़ व्यक्तिमत्त्व भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे ही राजकीय व्यक्ती कोण यावरून चर्चेला उधाण आले असून त्यावरून ‘पतंग’बाजीला वेग आला आहे.

लोकसभा ते जिल्हा परिषद निवडणूक असा सुमारे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या काही कमी व्हायला तयार नाही. सत्तावलयात राहण्याची सवय लागलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना सत्तावर्तुळ खुणावत असल्याने तसेच चौकशीचा ससेमिरा चुकावा या हेतूने सध्या प्रवेशाची ही रांग काही थांबायचे नाव घेत नाही. या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी लवकरच एक मोठा नेता भाजपवासीय होणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

राज्यमंत्रिमंडळातील द्वितीय स्थानी असलेल्या ‘दादा’ मंत्र्याने हे विधान केले म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या न गेल्या तर नवल. लगोलग या राजकीय नेत्यांबद्दल चर्चेलाही उधाण आले आहे. यामध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीमंत शाहू महाराज, माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांच्यापासून ते काँग्रेसमधील एक मातब्बर नेता आणि एका मोठय़ा शिक्षण संस्थेच्या कुलपतीपर्यंत अनेक नावांची ‘पतंग’बाजी सुरू झाली आहे.

First Published on September 9, 2017 3:44 am

Web Title: strong personality from western maharashtra will join bjp says chandrakant patil
टॅग Chandrakant Patil
 1. R
  Rajan Patil
  Sep 9, 2017 at 9:59 am
  तुम्हीही असल्या बातम्या पेरून पतंगबाजीच करीत आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. जर या पत्रकारालाच नक्की कोण आणि कधी प्रवेश करणार हे माहित नाही तर असले हवे मध्ये तिर मारून लोकांना संभ्रमात का टाकता? जरा थांबा आणि काय ते नक्की झाल्यावर लोकांपर्यंत पोहोचावा ती बातमी. पण नाही आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वांत पहिली बातमी कोण देतो याची चढाओढ. आणि मग स्वतःच तोंडावर आपटून घेतात. अशाने पत्रकारितेची विश्वासार्हता लोप पावत चालली आहेत त्याचे काही सोयरे सुतक नाही याना. बहुदा राणे विषय आता मागे पडलेला दिसतोय म्हणून नवी पूडी.
  Reply
  1. A
   ABHED
   Sep 9, 2017 at 9:33 am
   सत्तावलयात राहण्याची सवय आणि चौकशीचा ससेमिरा चुकावा या हेतूनेच सध्या सर्व नेते पक्षांतर करू पहात आहेत. भा ज प ने कणखर भूमिका घ्यावी व अशा लोकांना पक्षात स्थान देऊ नये . नाहीतर जनतेचा विश्वास उडेल पारदर्भक व तत्त्वनिष्ठ पक्षाची अवनती असेल.सत्ता लोलुप व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्व असे आहेत. हे जनता ओळखून आहे.
   Reply
   1. G
    Guruji
    Sep 9, 2017 at 9:31 am
    बेशरम बीजेपी ...एव्हढेच आपण म्हणू शकतो.....सत्तेसाठी वाट्टेल ते .कामें पुरुषस्य ना भयं ना लज्जा .....या बीजेपी मध्ये सुद्धा हीच अवस्था ...कालपर्यंत ज्यांना हे भ्रष्ट म्हणत होते ते आता पवित्र होत आहेत . मोदी हे राष्ट्रवादीला भ्रष्टवादी पार्टी म्हणत होते त्यांच्या घरी जाऊन ताटाला तत् लावून जेऊन सुद्धा आले ...आणि पदमभूषण पुरस्कार हि दिला ...राणेंना संपत्तीविषयक मा ्यात छगन भुजबळ होणार होता आता त्यांनाच घेण्याचे प्रयत्न चालू आहेत .....त्यामुळे बेशरम पार्टी एवढाच त्यांचा उल्लेख करायला हवा.प्रथम ह्या सर्वांवर बीजेपी जे आरोप करत होती , ते त्यांनी मागे घ्यायला हवेत....नाही का....
    Reply
    1. A
     arun
     Sep 9, 2017 at 6:21 am
     पवारसाहेबसुद्धा येतील बीजेपी मध्ये ! चंद्रकांत पाटलांनी त्यांना विचारायला काय हरकत आहे ? बलाढ्य म्हणजे दोन्ही अर्थानी तेही एकटेच आहेत. आमचे पंतप्रधान ज्यांचे बोट धरून राजकारणात आले आणि अचानक संघात गेले, तेच बोट धरून आता संघात यायला हरकत नाही.४ वर्षांनी राष्ट्रपतीपदहि मिळेल.
     Reply
     1. P
      Pamkesh
      Sep 9, 2017 at 4:16 am
      Saral sanga na Patang rao Kadam mhanun
      Reply
      1. Load More Comments