शहरात सध्या सुट्टय़ांमुळे भाविकांची व पर्यटकांची संख्या वाढत असल्याने  शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचा व पाìकगचा बोजवारा उडत आहे. तात्पुरता तोडगा म्हणून सुस्वरबाग व मेन राजाराम मदानावर पाìकगची व्यवस्था केली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने दोनही शाळांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून पाìकगसाठी जागा घेतली आहे. यामुळे िबदू चौक व अन्य ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी काहीअंशी कमी होण्यास मदत होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेने या नियोजनामुळे िबदू चौक, लक्ष्मीपुरी, भाऊसिंगजी रोड या रोडवर होणारी वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. मे महिन्याच्या सुट्टय़ांमुळे कोल्हापूर शहर सध्या हाऊसफुल्ल झाल्याचे दिसत आहे. गेल्या तीनचार दिवसांपासून भाविक व पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून, वाहने मोठय़ा संख्येने येत आहेत.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी मेन राजाराम हायस्कूल, झाकिर हुसेन (सुसुर बाग) स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल यांच्या व्यवस्थापनाशी संपर्क  साधून पाìकगची व्यवस्था करण्यात आली आहे. वरील शाळांच्या मुख्याध्यापकांनी चांगल्या सहकार्याची भूमिका घेतली आहे, तसेच शहर अभियंता सरनोबत यांचेही सहकार्य मिळाले आहे हे सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी मुस्लिम बोर्डिगच्या व्यवस्थापनाच्या वतीने गणी आजरेकर यांनी आवश्यक असेल त्या वेळी मुस्लिम बोर्डिगचे मदान पार्किंगसाठी देण्याची तयारी दाखवली आहे. आजही गेल्या तीन-चार दिवसांप्रमाणे गर्दी असून सकाळीच िबदू चौक येथील पार्किंग भरल्याने मेन राजाराम व सुसुर बाग येथे पार्किंग सुरू केले आहे. येणाऱ्या १०-१५ दिवसांत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आले आहे.