कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांत होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपाशी आघाडी करणार आहे. दोन्ही पक्षांच्या एकत्रित येण्याची घोषणा येत्या दोन दिवसांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व जनसुराज्यचे अध्यक्ष विनय कोरे मुंबईत पत्रकार परिषदेत करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी वर्षां निवासस्थानी भेट घेणार आहेत, ही माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी वर्षां निवासस्थानी भेट घेणार आहेतनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

खासदार संभाजीराजे, शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंग घाटगे या मातबरांनंतर भाजपच्या संपर्कात जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे येत आहेत.

महायुतीत पाच पक्ष असून या निमित्ताने आणखी एक नवा मित्र भाजपाशी जोडला जाणार असून यामुळे भाजपा व जनसुराज्यशक्ती या दोन्ही पक्षांना पश्चिम महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची आणखी संधी मिळणार आहे.

भाजपामध्ये आज राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका व इचलकरंजी नगरपालिकेतील भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अ‍ॅड.अलका स्वामी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पी.जी.िशदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णासाहेब शेंडूरे, जे.जे.मगदूम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सोनाली विजय मगदूम, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष यशवंत शेळके, कुरुंदवाड मनसेचे शहराध्यक्ष अवधूत बिरंजे यांच्यासह अन्य डझनभर प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अशी माहिती देऊन मंत्री पाटील म्हणाले, पक्ष प्रवेश करताना यापकी कोणीही कसलीही अट घातलेली नाही.

भाजप योग्य व्यक्तींचा योग्यवेळी योग्य ते पद देऊन सन्मान करीत असतो. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यापकी काहींना शासकीय पद देण्यात येईल. नव्यांचे स्वागत करताना भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय दिला जाईल. या पक्ष प्रवेशामुळे भाजप मजबूत झाला असून मित्रपक्षांसमवेत आपला झेंडा फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षात प्रवेश केलेले समरजीतसिंग घाटगे म्हणाले, चंद्रकांत पाटील व खासदार संभाजीराजे हे दोघेही गेल्या वर्षभरापासून मी भाजपात प्रवेश करावा यासाठी प्रयत्नशील होते. स्वर्गीय विक्रमसिंह राजेंची उणीव संभाजीराजे यांनी भरून काढली आहे. या निमित्ताने दोन राजे एकत्र येतात असेही दिसून आले आहे. या वेळी आमदार सुरेश हाळवणकर, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष िहदुराव शेळके, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबा देसाई आदी उपस्थित होते.