सरकारी अधिकारी आणि लोकप्रियता हे समीकरण आपल्याकडे क्वचितच पाहायला मिळते. फार कमी अधिकारी जनतेच्या आणि तरुणांईच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यातीलच एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणजे कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील. वारणेच्या कुशीत वसलेल्या कोकरुड नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीनं त्यांच नाव या गावची एक नवी ओळख झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च अधिकारी पदावर पोहोचण्यासाठी ग्रामीण आणि शहर अशी सीमा नसते, त्यासाठी हवा असतो तो विश्वास हेच नांगरे पाटील यांनी दाखवून दिले. नांगरे- पाटील यांचे नाव घेतल्यावर आठवते ती २६/११ ची काळरात्र, पुण्यातील रेव्ह पार्टीतील धडक कारवाई आणि अहमदनगरमध्ये रात्री अपरात्री सायकलीवरुन फिरुन गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये निर्माण केलेली दहशत. प्रशासकीय सेवेतीली त्यांच्या या कामगिरीमुळे ते ज्या ग्रामीण भागतून आले त्या भागातील तरुणांमध्ये प्रशासकीय सेवेत जाण्याचा कल वाढल्याचे पाहायला मिळते. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली, केवळ त्या विद्यापीठातच नव्हे तर राज्यभरात स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते प्रेरणा स्थान आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwas nangare patil birthday special artical for inspire story
First published on: 05-10-2017 at 14:48 IST