जिल्हय़ाचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार

प्रतिवर्षांप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा मंगळवारी बनवला आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे नळ पाणीपुरवठा योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, नवीन िवधन विहिरी घेणे, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावणे आदी उपायांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ६४ गावे आणि१०१ वाडय़ांसाठी हा आराखडा बनवला असला तरी त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

उन्हाची तीव्रता कोल्हापूर जिल्ह्याला जाणवू लागली आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ अनेक गावांवर आली आहे. याची दाखल घेत नेहमीप्रमाणे प्रशासनाने यंदाच्या उन्हाळय़ासाठी कोल्हापूर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जूनअखेरचा १ कोटी ३० लाखाचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे.

तालुकानिहाय गावे, वाडय़ा

६४ गावे आणि १०१ वाडय़ांसाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखडय़ामध्ये आजरा तालुक्यातील ६ गावे, १२ वाडय़ा, भुदरगड तालुक्यातील ११ गावे, २३ वाडय़ा, चंदगड तालुक्यातील १३ गावे, ९ वाडय़ा, गडिहग्लज तालुक्यातील १३ गाव,े ३ वाडय़ा, हातकणंगले तालुक्यातील ७ गावे, १३ वाडय़ा, करवीर तालुक्यातील २ गावे, कागल तालुक्यातील १० वाडय़ा, पन्हाळा तालुक्यातील ६ गावे ४ वाडय़ा, राधानगरी तालुक्यातील ४ गावे, २२ वाडय़ा, शाहूवाडी तालुक्यातील २ गावे आणि शिरोळ तालुक्यातील ४ वाडय़ांचा समावेश आहे.

समाविष्ट कामे

एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला असून, यासाठी १६५ उपाययोजना निश्चित केल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक विहिरी खोल करणे, गाळ काढणे २ कामे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे ४२, प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे २, नवीन िवधन विहिरी घेणे १०५, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती १० आणि तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजना करणे ४ कामांचा समावेश आहे.