बेडकीहाळ (कर्नाटक) येथील सेंट्रींग कामगाराने येथील रेल्वे स्थानकाच्या शेडमध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी परिख पुलानजीक असणाऱ्या  शेडमध्ये ही घटना घडली. दीपक तानाजी भोसले (वय ३०, रा. बेडकिहाळ, रा. कर्नाटक) असे मृताचे नाव आहे.

दीपक भोसले कोल्हापूर येथील बालगोपाल तालमीनजीक राहणाऱ्या नातेवाईकांकडे जातो, असे सांगून ९ दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. मात्र तो अद्याप घरी परतला नव्हता. शुक्रवारी सकाळी परिख पुलानजीक असणाऱ्या शेडमध्ये लोखंडी अँगलला एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाशेजारी असणारा मोबाईल व खिशातील कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख पटली.

Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा