विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा २०१६मध्ये भारतात होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) गुरुवारी जाहीर करण्यात आले. ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
आयसीसीच्या मुख्यालयात अध्यक्ष मुस्तफा कमाल आणि कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बैठकीत सर्व पूर्ण सदस्य आणि सहसदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. क्रिकेटजगताला दिशा देणारे काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. २०१९पर्यंतच्या आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धाना या वेळी मान्यता देण्यात आली.

स्पर्धा                              तारखा                          यजमान
विश्वचषक ट्वेन्टी-२०     ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६      भारत
चॅम्पियन्स करंडक       १ ते १९ जून २०१७                    इंग्लंड
महिला विश्वचषक     ४ ते २७ ऑगस्ट २०१७                 इंग्लंड
म. विश्वचषक ट्वेन्टी-२०     २ ते २५ नोव्हेंबर २०१८      वेस्ट इंडिज
विश्वचषक स्पर्धा    ३० मे ते १५ जुलै        इंग्लंड