भारतात सचिन तेंडुलकरचा चाहता वर्ग किती मोठा आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. २६ मे २०१७ या दिवशी सचिनच्या आयुष्यावर प्रेरित असलेला, ‘Sachin: A Billion Dream’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र या चित्रपटाने सचिनच्या चाहत्यांच्या यादीत काही नवीन चाहत्यांची भर घातली आहे. नुकतंच तारा नावाच्या ६ वर्षाच्या एका मुलीने हा चित्रपट पाहून सचिनला एक पत्र लिहिलं. या पत्रातला संदेश इतका निरागस होता, की सचिनला हे पत्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्याचा मोह आवरला नाही. या पत्रात लहानग्या ताराने सचिनचा मुलगा अर्जुन, मुलगी साराला प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी मागितली. सहा वर्षाच्या मुलीने स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पत्राची दखल घेत सचिनने तिचे मनापासून आभार मानले.

Hi, Taara! Thank you so much for writing to me.. I’m really glad that you enjoyed the movie. Keep smiling 🙂

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

२०१३ साली सचिनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र आजही त्याला फॉलो करणाऱ्या चाहत्यांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारा सचिन नेहमी आपल्या चाहत्यांनी पाठवलेले संदेश शेअर करत असतो. ३० जूनला सचिनने आपल्या चाहत्यांनी पाठवलेली काही पत्रं शेअर केली होती.

Thank you for your kind letter, Supraj! It made my day. Keep working hard! #FanFriday

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

Thank you for your letter, Avineeshwar! This really brought a smile on my face. My best wishes to you. Keep working hard!!

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on