झिम्बाब्वेने चौथ्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ-लुइस नियमानुसार अफगाणिस्तानवर सात विकेट्स राखून विजय मिळवताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी मिळवली.

अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १११ धावांवर गुंडाळून झिम्बाब्वेने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. सोलोमोन मिरे (४६) आणि पीटर मूर (नाबाद ३६) यांनी झिम्बाब्वेला दमदार सुरुवात करून दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे झिम्बाब्वेसमोर ४२ षटकांत १०७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. त्यांनी २२.२ षटकांत ३ बळींच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज पार करून मालिका २-२ अशा बरोबरीत आणली.

संक्षिप्त धावफलक –

अफगाणिस्तान : ३८.५ षटकांत १११ (असघर स्टॅनिकझाई १९; ख्रिस मपोफू ३/२५, तेंडाई चटारा २/३२, गॅ्रमी क्रेमर २/१२) पराभूत वि. झिम्बाब्वे : (सुधारित लक्ष्य ४२ षटकांत १०७) २२.२ षटकांत ३ बाद १०७ (सोलोमोन मिरे ४६, पीटर मूर नाबाद ३६; मोहम्मद नबी २/११).