मुंबईच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरकडे सोपवण्यात आले आहे. शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनने विविध निवड समित्यांची घोषणा केली.

मुंबईच्या या समितीमध्ये आगरकरसह भारताचा माजी फिरकीपटू नीलेश कुलकर्णी, जतीन परांजपे आणि सुनील मोरे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही निवड समिती वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील संघांची निवड करणार आहे.

मुंबईच्या १९-वर्षांखालील मुलांच्या निवड समितीचे अध्यक्षपद माजी क्रिकेटपटू राजेश पोवारकडे सोपवण्यात आले आहे. या निवड समितीमध्ये भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज अविष्कार साळवीसह राजू सुतार आणि संतोष शिंदे यांचा समावेश असेल.

मुंबईच्या अन्य निवड समिती पुढीलप्रमाणे –

  • १६-वर्षांखालील मुलांचा संघ : अतुल रानडे (अध्यक्ष), मंदार फडके, पीयूष सोनेजी, मयूर कद्रेकर.
  • १४-वर्षांखालील मुलांचा संघ : ओमकार खानविलकर (अध्यक्ष), संजीव जाधव, नीलेश पटवर्धन, मंगेश दरेकर.
  • वरिष्ठ महिला संघ : तृप्ती भट्टाचार्य (अध्यक्ष), संगीता कामत, विशाखा दळवी, राहुल ठाकूर.
  • १९-वर्षांखालील मुलींचा संघ : कल्पना मूरकर (अध्यक्ष), सोनाली विग, अपूर्व कोकिळ, अमोल घाग.
  • पुरुषांचा विद्यापीठ संघ : मुसावीर खोटे, रवी कुलकर्णी, भरत कर्णिक.
  • महिलांचा विद्यापीठ संघ : आरती वैद्य, वृंदा भगत, सीमा पुजारे.