भारताच्या एच.एस.प्रणॉयने आपल्याच देशाच्या परुपल्ली कश्यपवर २१-१५, २०-२२, २१-१२ अशी सरळ सेट्समध्ये मात करत अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला.

सेटच्या सुरुवातीपासूनचं कश्यपने सामन्यात आघाडी घेतली होती. सुरुवातीला कश्पने आपल्या झंजावाती खेळापुढे प्रणॉयला सामन्यात परतायची संधी दिलीच नाही. सुरुवातीच्या सत्रात कश्यपकडे ७-१ अशी आघाडी होती. मात्र यानंतर प्रणॉने कश्यपला चांगली लढत दिली. काही सुंदर फटके लगावत प्रणॉयमे ही आघाडी ८-६ अशी भरुन काढली. मात्र प्रणॉयने परत ११-७ अशी आघाडी घेत सामन्याची सुत्र आपल्या हातात घेतली. तरीही प्रणॉय सामन्यावरची आपली पकड सोडायला तयार नव्हता. काही सुरेख स्मॅशचे फटके वापरत प्रणॉयने सामन्यात १२-१२ अशी बरोबरी साधली. यानंतर प्रणॉयने सामन्यात परत मागे वळून बघितलंच नाही. एका क्षणाला प्रणॉयकडे १७-१५ अशी २ गुणांची आघाडी होती, यानंतर लागोपाठ ४ पॉईंट मिळवत प्रणॉयने पहिला सेटही आपल्या नावे केला.

दुसऱ्या सेटमध्येही कश्यपने अपेक्षेप्रमाणे चांगली सुरुवात करत सामन्याच्या सुरुवातीलाच आपल्याकडे आघाडी ठेवली होती. ३-० अशा आघाडीवरुन कश्यपने काही चुकीचे फटके खेळत सामन्यात शिरकाव करायला प्रणॉयला संधी दिली, त्यामुळे सुरुावातीपासून ३-० अशा आघाडीवर असणारा कश्यप ६-६ अशा बरोबरीवर खेळायला लागला. मात्र या सेटमध्ये कश्यपने प्रणॉयला फारशी संधी दिली नाही. विश्रांतीनंतर कश्यपकडे १५-१२ अशी ३ गुणाची आघाडी होती. इथून पुढे हा सेट कश्यप हा सेट जिंकणार असं वाटत असतानाच, प्रणॉयने सामन्यात परत पुनरागमन करुन १५-१५ अशी बरोबरी साधली. अखेर ही कोंडी फोडून आघाडी घेण्यात कश्यपला पुन्हा एकदा यश आलं, मात्र यावेळीही प्रणॉयने सेटमध्ये पुन्हा बरोबरी साधत कश्यपला चांगली टक्कर दिली. ही बरोबरी सेटच्या अखेरीस २०-२० अशी सुरु होती. मात्र मोक्याच्या क्षणी आपला सर्व अनुभव पणाला लावत कश्यपने दुसरा सेट २२-२० अशा आपल्या खिशात घातला.

मात्र तिसऱ्या सेटमध्ये प्रणॉयने अनपेक्षितरित्या सामन्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली. ३-१ अशा गुणांवरुन प्रणॉयने तिसऱ्या सेटच्या एका क्षणापर्यंत आपल्याकडे १०-६ अशी ४ गुणांची भरभक्कम आघाडी घेतली. या सेटमध्ये प्रणॉय एका वेगळ्याच अंदाजात खेळत होता. कश्यपला एकदाही सामन्यात परतण्याची संधी प्रणॉयने या सेटमध्ये दिली नाही. तिसऱ्या सेटच्या अखेरच्या क्षणांमध्ये प्रणॉयने २०-१० असे १० मॅच पॉईंट जिंकत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. यातील २ पॉईंट कश्यपने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यानंतर कश्यपला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी न देता प्रणॉयने तिसरा सेट आणि सामना आपल्या खिशात घातला.

एच.एस.प्रणॉयचं आपल्या कारकिर्दीतलं हे तिसरं महत्वाचं विजेतेपद आहे.