प्रशिक्षक बदलले, खेळाडूंची अदलाबदल झाली, अँजेल डी मारियासारखा दर्जेदार खेळाडू संघात आला, पण मँचेस्टर युनायटेडची पराभवाची साडेसाती संपता संपत नाही. लीग चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मँचेस्टर युनायटेडचा मिल्टन केयनेस डॉन्स या तिसऱ्या दर्जाच्या संघाने ०-४ असा धुव्वा उडवला.
रिअल माद्रिदकडून मँचेस्टर युनायटेडने डी मारियाला ७५ दशलक्ष युरोना विकत घेतल्याची घोषणा केली; पण काही तासांनंतरच मँचेस्टर युनायटेडला दुबळ्या संघाकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. विल ग्रिग याने २५व्या मिनिटाला एमके डॉन्सचे खाते उघडल्यानंतर ६३व्या मिनिटाला त्याने दुसऱ्या गोलाची भर घातली. त्यानंतर बेनिक अफोबे याने ७०व्या आणि ८४व्या मिनिटाला दोन गोल करत एमके डॉन्सच्या विजयावर मोहोर उमटवली.
‘‘मोक्याच्या क्षणी आमच्या खेळाडूंनी चुका केल्या. नऊ खेळाडू जायबंदी असल्यामुळे आम्हाला युवा संघ उतरवावा लागला. खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. हा पराभव खेदजनक आहे,’’ असे युनायटेडचे प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांनी सांगितले. एएफपी, ब्रिटन
प्रशिक्षक बदलले, खेळाडूंची अदलाबदल झाली, अँजेल डी मारियासारखा दर्जेदार खेळाडू संघात आला, पण मँचेस्टर युनायटेडची पराभवाची साडेसाती संपता संपत नाही. लीग चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मँचेस्टर युनायटेडचा मिल्टन केयनेस डॉन्स या तिसऱ्या दर्जाच्या संघाने ०-४ असा धुव्वा उडवला.
रिअल माद्रिदकडून मँचेस्टर युनायटेडने डी मारियाला ७५ दशलक्ष युरोना विकत घेतल्याची घोषणा केली; पण काही तासांनंतरच मँचेस्टर युनायटेडला दुबळ्या संघाकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. विल ग्रिग याने २५व्या मिनिटाला एमके डॉन्सचे खाते उघडल्यानंतर ६३व्या मिनिटाला त्याने दुसऱ्या गोलाची भर घातली. त्यानंतर बेनिक अफोबे याने ७०व्या आणि ८४व्या मिनिटाला दोन गोल करत एमके डॉन्सच्या विजयावर मोहोर उमटवली.
‘‘मोक्याच्या क्षणी आमच्या खेळाडूंनी चुका केल्या. नऊ खेळाडू जायबंदी असल्यामुळे आम्हाला युवा संघ उतरवावा लागला. खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. हा पराभव खेदजनक आहे,’’ असे युनायटेडचे प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांनी सांगितले.