जागतिक अॅथलिट स्पर्धेत लांब उडी प्रकारात भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून देणारी अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिचा आता ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या यादीतही समावेश होण्याची शक्यता आहे. १३ वर्षांपूर्वी झालेल्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत मारलेल्या लांब उडीबद्दल तिला रौप्यपदक दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २००४ सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत अंजू जॉर्ज हिने ६.८३ मीटर लांब उडी मारून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. पण स्पर्धेत तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

 

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकावर त्यावेळी रशियाच्याच स्पर्धकांनी नाव कोरले होते. मात्र, रशियाच्या या खेळाडूंच्या कामगिरीबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. अखेर २०१३ साली हा संशय खरा ठरला. पदक विजेत्या रशियाच्या खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्या. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये त्यांनी मिळवलेली पदकं त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. ही तिन्ही पदकं आता त्यावेळी चौथ्या स्थानावर समाधान मानाव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाची ब्रॉनविन थॉम्पसन, पाचव्या स्थानावर भारताची अंजू आणि सहाव्या स्थानावरील ब्रिटनची जेड जॉन्सन यांना दिली जाण्याची शक्यता आहे. ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार अंजूचे पती आणि माजी प्रशिक्षक बॉबी जॉर्ज यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे यासाठीचा पाठपुरावा करणार आहेत.

२००४ साली रशियाच्या तात्याना लेबेडेवा, इरिना मेलेशिना आणि तात्याना कोटोव्ह या तिघींनी अथेन्स ऑलिम्पिकमध्ये लांब उडी प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली होती.