सिनिअर एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या इंद्रजित सिंग याने गोळाफेकमध्ये बुधवारी सुवर्णपदक पटकावले. इंद्रजित सिंग २०१६ मध्ये होणाऱया रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी याआधीच पात्र ठरला आहे.
एशियन अॅथलेटिक्स स्पर्धेत २०.४१ मीटर लांब गोळा फेकत इंद्रजित सिंगने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याच प्रकारात चीनच्या चॅंग मिंग-हुआंग याने रौप्य तर चीनच्याच तिआन झिझॉंग याने कास्य पदक मिळवले.