सॉल निग्युएजच्या खळबळजनक वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या लीग लढतीत पाहुण्या बायर्न म्युनिकवर १-० असा विजय मिळवत आघाडी घेतली आहे. सॉलने म्युनिचच्या चार खेळाडूंना अप्रतिमरीत्या चकवून ११व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. उत्तम बचावफळी उभी करून अ‍ॅटलेटिकोने बाजी मारली.