आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांतवर तिहार तुरुंगामध्ये प्राणघातक हल्ला झाला होता आणि तो त्यातून सुखरूप बचावला होता, असा गौप्यस्फोट श्रीशांतचा मेहुणा आणि मल्याळम गायक मधू बालकृष्णनने शुक्रवारी केला़
‘‘तिहार तुरुंगात हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या एका गुंडाकडून श्रीशांतला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता़  धारदार शस्त्राने हा हल्ला चढवण्यात आला होता आणि त्यात नशिबाने श्रीशांत बचावला,’’ असे बालकृष्णन याने एका मल्याळम टीव्ही चॅनलला सांगितल़े  ‘‘ श्रीशां अजूनही या मानसिक धक्क्यातून सावरला नाही़  तुरुंगातून बाहेर आल्यानंतर श्रीशांतने ही घटना कुटुंब सदस्यांना सांगितली,’’ असे बालकृष्णनने सांगितले.