ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारत दौऱ्यासाठी सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियन बोर्डाने १७ सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर येणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा केली. या दौऱ्यावर स्मिथच्या नेतृत्वाखालील संघात अष्टपैलू फॉकनरला  स्थान देण्यात आले असून दुखापतग्रस्त मिशेल स्टार्कला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील ख्रिस लॅन, जेम्स पॅटिंनसन, जॉन हेस्टिंग्स आणि मिशेल स्टार्क या शिलेदारांना दुखापतीमुळे विश्रांती दिली आहे.

तर २०१५ मध्ये विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असणाऱ्या फॉकनरने पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले. इंग्लंडमध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स करंडक चषकातील ऑस्ट्रेलियन संघात फॉकनरला संधी मिळाली नव्हती.  भारत दौऱ्यातून तो पुन्हा पुनरागमन करतोय. एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात स्टिव्ह स्मिथकडे कर्णधार पदाची धूरा देण्यात आली आहे. हेजलवूडला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले असले तरी टी २० संघापासून त्याला दूर ठेवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ

स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच, ग्लॅन मॅक्सवेल, मार्कस स्टोएनेस, ट्रेविस हेड, मॅथ्थू वेड, नॅथन कुल्टर नाइल, पॅट केमिन्स, जेम्स फॉकनर, जोश हेजलवूड, अॅस्टन अॅगर, हिल्टन कार्टवाइट, अॅडम झॅम्पा, मोजिस हेनरीकेज

ऑस्ट्रेलिया टी-२० संघ
स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन,डेन क्रिस्टन, नॅथन कुल्टर नाइल, पॅट केमिन्स, अॅरॉन फिंच, ट्रेविस हेड, मोजिस हेनरीकेज, ग्लॅन मॅक्सवेल, टिम पाइन, अॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन