पावसाने व्यत्यय आणल्यानंतर झालेल्या ६ षटकांच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून मात केली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर अंकुश ठेवत, भारताने १८.४ षटकात ऑस्ट्रेलियाला ११८ धावांपर्यंत मजल मारू दिली. मात्र यानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे भारतीय संघाला ६ षटकांमध्ये ४८ धावांचं आव्हान देण्यात आलं.

पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळपट्टी नेमकी कोणाला साथ देणार याची जराही कल्पना नसल्याने हा सामना कोण जिंकेल याची खात्री देता येत नव्हती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारताला चांगली टक्कर देत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहली आणि शिखर धवनच्या फटकेबाजीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.

  • विजयाची औपचारिकता विराट कोहली आणि शिखर धवन जोडीकडून पूर्ण
  • कुल्टर नाईलने उडवला रोहितचा त्रिफळा, भारताला पहिला धक्का
  • भारतीय डावाची आक्रमक सुरुवात, रोहीतची फटकेबाजी
  • सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला
  • आणखी एक खेळाडू धावबाद, कांगारुंना आठवा धक्का
  •  त्याच षटकात बुमराहने उडवला कुल्टर नाईलचा त्रिफळा, ऑस्ट्रेलियाचे ७ गडी माघारी
  • टीम पेन माघारी, ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का
  • ठराविक अंतराने कांगारुंच्या विकेट पडण्याचं सत्र सुरुच
  • ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, भारताचं सामन्यावर वर्चस्व
  • ट्रेविस हेडचा त्रिफळा उडवत हार्दिक पांड्याचा कांगारुंना पाचवा धक्का
  • कुलदीप यादवचा कांगारुंना आणखी एक धक्का, हेनरिकेज बाद
  • कुलदीप यादवने उडवला फिंचचा त्रिफळा, कांगारुंचे ३ गडी माघारी
  • अॅरोन फिंचची झुंज सुरुच, फिरकी गोलंदाजीवर फिंचची फटकेबाजी
  • मॅक्सवेलला बाद करत चहलचा ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
  • दुसऱ्या बाजूने मॅक्सवेलचीही फिंचला उत्तम साथ, दोघांमध्ये ४७ धावांची भागीदारी
  • फिंच – मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, फिंचच्या फटकेबाजीमुळे कांगारुंनी ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • दोन चौकारांनंतर तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरचा त्रिफळा उडवत भुवनेश्वरचा कांगारुंना पहिला धक्का
  • डेव्हीड वॉर्नरकडून ऑस्ट्रेलियाच्या डावाची आक्रमक सुरुवात, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर लागोपाठ २ खणखणीत चौकार
  • आशिष नेहराला संघात जागा नाही
  • अक्षर पटेल ऐवजी कुलदीप यादवचा संघात समावेश, रहाणेऐवजी शिखर धवनचं संघात पुनरागमन
  • नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय