कर्णधारपदाची जबाबदारी सोडली असली तरीही महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा खऱ्या अर्थाने तारणहार आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही. गोलंदाजीतले बदल असो किंवा मधल्या फळीत फलंदाजी करताना संघाचा डाव सावरणं, अशी सर्व काम धोनी आजही तितक्याच दिमाखात करतो आहे. धोनीच्या संघात असण्याबद्दल आतापर्यंत अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केली, मात्र भारताचा नवीन कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी हा भारतीय संघाची गरज असल्याचं मान्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत आज दुसरा वन-डे सामना खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यावर जरी पावसाचं सावट असलं तरीही धोनी आपल्या सरावात कसलीही कमतरता ठेवत नाहीये. मात्र या सामन्याच्या आधी कोलकात्यात धोनीने केलेला सराव पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?
Russell Completes 200 Sixes In IPL
IPL 2024 : ख्रिस गेल, रोहित आणि धोनी यांनाही जे जमलं नाही ते रसेलने केलं, पहिल्याच सामन्यात नोंदवला ‘हा’ खास विक्रम
IPL 2024 Punjab Kings vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024 PBKS vs DC: पहिल्याच सामन्यात दिल्लीचा दिग्गज गोलंदाज इशांत शर्माला दुखापत, DC संघाला बसला मोठा फटका

गेले काही दिवस कोलकात्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भारतीय संघाला सराव करता आलेला नाहीये, बहुतांश खेळाडूंनी हॉटेलवर राहणं पसंत केलं असतानाच धोनीने थेट शुटींग रेंज गाठली. कोलकाता पोलिसांच्या शुटींग रेंजला भेट देत धोनीने आपलं शुटींग स्किलही इथे आजमावून पाहिलं. कोलकाता पोलिसांनी आपल्या फेसबूक पेजवर धोनीचा शुटींगचा सराव करताना व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे.

धोनीसारख्या खेळाडूने आमच्या शुटींग रेंजला भेट देणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक बाबतीत त्याचा मेहनत करण्याचा सराव सर्वांनी घेण्यासारखा असल्याचं, कोलकाता पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं. धोनीने काल १० मी. आणि २५ मी. च्या रेंजवर शुटींगचा सराव केला. कालच बीसीसीआयने पद्मभुषण पुरस्कारासाठी धोनीच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनी आपला चांगला फॉर्म कायम ठेवत कांगारुंची दाणादाण उडवेल, अशी आशा सर्व क्रीडारसिक करत आहेत.