ऑस्ट्रेलियन हॉकी लीगमध्ये अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू खेळत असले तरीही सर्वोत्तम कौशल्य दाखवत चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास भारताच्या पुरुष ‘अ’ संघाचा कर्णधार विकास दहिया व महिला ‘अ’ संघाची कर्णधार प्रीती दुबे यांनी व्यक्त केला. ही स्पर्धा २८ सप्टेंबरपासून पर्थ येथे सुरू होत आहे.

या स्पर्धेतील दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी १० संघ सहभागी झाले असून, या संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारतीय पुरुष संघाचा सराव सध्या बेंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) येथे सुरू आहे. महिला संघाचे शिबीर भोपाळ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात आयोजित करण्यात आले आहे.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

‘‘भारताने गतवर्षी लखनौ येथे कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. या संघातील बऱ्याचशा खेळाडूंचा भारत ‘अ’ संघात समावेश आहे. त्यामुळे आम्हाला तेथे सर्वोत्तम कामगिरीचीच अपेक्षा आहे. संघातील खेळाडूंमध्ये चांगला सुसंवाद आहे. ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू खेळत असल्यामुळे आमच्या खेळाडूंना तेथे भावी कारकीर्दीसाठी शिकवणीची शिदोरी मिळणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याची संधी असल्यामुळे प्रत्येक खेळाडू सर्वोच्च कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करील. भुवनेश्वर येथे पुरुषांच्या जागतिक हॉकी लीगचा अंतिम टप्पा होणार असल्यामुळे तेथील संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक आहे,’’ असे दहियाने सांगितले.

‘‘आमच्या संघातील चार-पाच अनुभवी खेळाडूंचा अपवाद वगळल्यास बऱ्याचशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अपेक्षेइतका अनुभव नाही. तसेच या स्पर्धेत प्रथमच महिला संघ सहभागी होत आहे. साहजिकच सर्वासाठी हा अनुभव नवीन असणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडू तेथे खेळण्यासाठी उत्सुक आहे. भावी कारकीर्दीसाठी ऑस्ट्रेलियन लीग हे व्यासपीठ असणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू वेगवान चाली करण्याबाबत ख्यातनाम आहेत. खेळाच्या प्रत्येक आघाडीवर चांगले कौशल्य दाखवण्यावर आमचा भर राहणार आहे,’’ असे दुबेने सांगितले.