सलामीवीर फिल ह्य़ुजेसला ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनीही आदरांजली वाहत त्याच्या निधनाच्या बातमीला पहिल्या पानावर जागा दिली आहे. ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’ने तर तब्बल १२ पानांवर फिलशी संबंधित मजकूर छापला आहे. त्याचबरोबर अन्य वृत्तपत्रांनीही फिलच्या निधनासंबंधित वृत्ताचे बरेच कंगोरे दाखवले आहेत.
सिडनी मॉर्निग हेराल्ड : खेळावर प्रेम करणाऱ्या देशाला फिलिपच्या जाण्याने अतीव दु:ख झाले असून त्यांच्या मनावर हा मोठा आघात आहे.           
दी एज : क्रिकेटसाठी हा सर्वात वाईट दिवस आहे. फिलचे निधन धक्कादायक होते. मृत्यू होत असतात, पण फिलचा मृत्यू नेहमीच बोचत राहील.
कुरिअर मेल : फिल हा अजातशत्रू होता, त्याचे कोणाबरोबरही वैर नव्हते. सर्वाबरोबर नेहमीच हसत-खेळत राहायचा. त्यामुळे त्याचासारख्या खेळाडूच्या जाण्याच्या शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. फिल चिरंतन साऱ्यांच्या स्मरणात राहील.