ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या पी.व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक बॅडमिंटनमधील अव्वल मानांकित चीनच्या ताई झु यिंगने सिंधूला १०-२१, २२-२०, २१-१६ असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीच्या सेटमध्ये सिंधूने पहिला पॉईंट घेत दमदार सुरुवात केली. पहिला सेट सिंधूने २१-१० असा जिंकला.  मात्र दुसऱ्या सेटमध्ये ताई झु यिंग दमदार वापसी केली. या दोघींनी दमदार खेळी करत सेट ब्रेक पाईंटमध्ये नेला. अखेर २२-२० असा हा सेट जिंकत ताईने सिंधूशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये सिंधूनं पहिला पॉईंट घेत पुन्हा दमदार सुरुवात केली. हा सेट जिंकून ताईला पराभूत करेल असे वाटले होते. पण  ताईने अधिक प्रभावी खेळ करत आपल्या नावाला साजेसा खेळ केला. १५- १५ अशा बरोबरीनंतर मिळालेली आघाडी कायम ठेवत तिने २१-१६ अशा फरकाने सिंधूला  पराभूत केले.