ओडिशाविरुद्ध गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या रणजी क्रिकेट सामन्यासाठी महाराष्ट्र संघात भरत सोळंकी या अष्टपैलू खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.

पहिल्या सामन्यात त्यांनी हरयाणाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली होती. या सामन्यात खेळलेल्या डॉमिनिक मुथ्थुस्वामी याच्याऐवजी सोळंकी याला स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्र संघाचे नेतृत्व रोहित मोटवानी करीत असून हर्षद खडीवाले, स्वप्नील गुगळे, केदार जाधव, अंकित बावणे, चिराग खुराणा, राहुल त्रिपाठी यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत त्यांना  अक्षय दरेकर, श्रीकांत मुंडे, समाद फल्लाह, निकित धुमाळ, अनुपम संकलेचा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

ओडिशाचे नेतृत्व अभिलाष मलिक करीत असून त्यांच्या फलंदाजीची भिस्त गोविंद पोड्डोर, अनुराग सरंगी यांच्यावर आहे.