23 June 2017

News Flash

भुवनेश्वर कुमारसोबत ‘डिनर डेट’वर गेलेली ‘ती’ कोण?

भुवीने इंस्टावर फोटो शेअर केला

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: May 19, 2017 10:47 PM

फोटोच्या कॅप्शनमध्ये लवकरच पूर्ण फोटो पाहायला मिळेल, असे म्हणत चाहत्यांची उत्कंठा ताणून धरली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज आणि आयपीएलमध्ये यंदा आपल्या भेदक माऱ्याने सर्वांची मनं जिंकलेला भुवनेश्वर कुमार प्रेमात क्लीनबोल्ड झालाय असं सांगण्यात येत आहे. भुवी नुकताच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत ‘डिनर डेट’वर गेल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. भुवनेश्वर कुमार सध्या अभिनेत्री अनुस्मृती सरकार हिला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृतपणे माहिती दोघांपैकी कोणीही दिली नसली तरी माध्यमांमधील वृत्तानुसार हे दोघं गुरूवारी एका हॉटेलमध्ये एकत्र दिसून आले.

अनुस्मृतीसोबत डेटवर जात असताना भुवी कॅमेरात कैद झाला. दोघं एकाच कारने हॉटेलमध्ये दाखल झाले. माध्यमांची नजर पडताच भुवीने स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न देखील केला. मग भुवीनेही पुढे येऊन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर डिनर डेटला गेल्याचा फोटो शेअर केला. पण भुवीने इथेही गुगली टाकली. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर फक्त अर्धा फोटो शेअर करून यात समोरची व्यक्ती दिसणार नाही याची काळजी भुवीने घेतली आहे. पण फोटोच्या कॅप्शनमध्ये लवकरच पूर्ण फोटो पाहायला मिळेल, असे म्हणत चाहत्यांची उत्कंठा ताणून धरली आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार भुवीसोबतची ‘ती’ मुलगी अनुस्मृती सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही हे दोघं एकत्र दिसून आले होते.

Dinner date

First Published on May 19, 2017 10:47 pm

Web Title: bhuvneshwar kumar spotted with mystery actress on dinner date
  1. No Comments.