टीम इंडियातील एखाद्या सदस्याचा वाढदिवस म्हणजे आपल्या खेळाडूंसाठी पर्वणीच असते. पंरतु जर दोन खेळाडूंचे वाढदिवस एकाच दिवशी असतील तर तो आनंद सोहळाच ठरतो.

आपल्या आंतरराष्ट्रीय टीमचे सदस्य रवींद्र जडेजा ज्यांना प्रेमांना सर्व जण ‘सर’ म्हणतात आणि करुण नायर यांचा ६ डिसेंबर रोजी वाढदिवस होती. हा वाढदिवस एक नाही तर दोन केक कापून साजरा करण्यात आला.

टीमच्या सदस्यांना त्यांना केक नुसताच भरवला नाही तर त्यांच्या तोंडाला देखील लावला. आपल्या टीमची ही धमाल इंडियन क्रिकेट टीमने फेसबुकवरुन शेअर केली आहे.

आपल्या आवडत्या टीम मेम्बरचा वाढदिवस म्हणून सर्वांनी सर जडेजांना ट्विटरवरुन ट्रोल केले.

रवींद्र जडेजा व्यतिरिक्त आरपी सिंह आणि करुण नायर यांचा आज वाढदिवस आहे. ६ डिसेंबर रोजी तुमचा वाढदिवस असेल तर भारतीय संघात खेळण्याची तुमची संधी वाढते असे वीरेंद्र सेहवागने म्हटले.

रोहित शर्माने देखील आपल्या खास शैलीत जडेजाला शुभेच्छा दिल्या आहेत. तुझे खरे वय आता तरी सांग सगळ्यांना वाटते की तू २८ वर्षांचा आहे.