सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्यानिमित्ताने मैदानात दोन्ही संघाच्या खेळाडुंकडून एकमेकांना डिवचण्याचे प्रकार पाहायला मिळत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका मैदानाबाहेर आजी-माजी खेळाडुंमध्ये रंगलेल्या वाकयुद्धामुळेही चांगलीच गाजत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज याने विराट कोहलीसंदर्भात वादग्रस्त विधान करून या वादाला आणखी फोडणी दिली आहे. ब्रॅड हॉजने थेट विराटच्या भारतीय संघाविषयीच्या बांधिलकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याने आगामी आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत जाणुनबुजून विश्रांती घेतली, असा सणसणीत आरोप त्याने केला आहे.

विराट कोहली आयपीएलमध्ये खेळण्याला जास्त महत्त्व देत आहे का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून ब्रॅड हॉजला विचारण्यात आला. त्यावेळी ब्रॅड हॉजने म्हटले की, असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. केवळ विराटच नव्हे तर अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेची वाट पाहत असतात. अखेर या स्पर्धेत मोठ्याप्रमाणावर पैसा आहे. पैसा जरी महत्त्वाचा असला तरी काही खेळाडू आयपीएल स्पर्धेपूर्वी विश्रांती मिळविण्यासाठी जाणुनबुजून दुखापतीचे नाटक करतात. अखेर ही क्रिकेट विश्वातील महत्त्वाची स्पर्धा आहे, असे मत ब्रॅड हॉज याने मांडले.

rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
Ambati Rayudu Hosts Mandatory Biryani Party for Chennai Super Kings Players in Hyderabad
IPL 2024: अंबाती रायुडूने CSK च्या खेळाडूंना दिली बिर्याणीची मेजवानी, पाहा VIDEO
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

सामन्यांमधील रंगत, मैदानावरील आणि बाहेरील वादविवाद, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, प्रतिमा डागाळण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आदी गोष्टींमुळे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेने आधीच कळस गाठला आहे. विराटला तिसऱ्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे धर्मशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. हा सामना संपल्यानंतर आता भारतीय खेळाडू ५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रॅड हॉजने अप्रत्यक्षपणे विराटला लक्ष्य केले आहे. आयपीएलच्या बंगळुरु आणि हैदराबाद संघांमधल्या सलामीच्या आयपीएल सामन्यात विराट खेळला तर ते खूप वाईट असेल, असं भाष्यही त्यानं केलं. ब्रॅड हॉज हा आयपीएलमधल्या गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षकही आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये बंगळुरूचा कर्णधार असलेल्या विराटवर टीका करणे हा ब्रॅह हॉजच्या गेम प्लॅनचा भाग असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.