‘‘इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली आहे, त्याचे मी सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका आम्हीजिंकली असली तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते. तेथे प्रत्येक चेंडू व धाव सामन्याला कलाटणी देणारी ठरू शकते. अर्थात कसोटी मालिकाजिंकल्यामुळे आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे मत कर्णधार ईऑन मॉर्गनने प्रकट केले.
‘‘संघात अनेक तरुण व नवोदित खेळाडू असले तरी आपले कौशल्य दाखविण्यासाठी ते उत्सुक झाले आहेत. भारतीय खेळपट्टीवर भारताला पराभूत करणे हे एक आव्हानच असते. मात्र हे आव्हान आम्ही सहजपणे पेलवू,’’ असे मोर्गनने सांगितले.